सिल्लोडमध्ये १८ जिनिंगवर कापूस खरेदी

Foto
बाजार समितीला डावलून पणन संचालकांचा मोठा निर्णय

सिल्लोड, (प्रतिनिधी) _:  तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रावरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण सुरू आहे. बाजार समितीने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्यानंतर, अखेर पणन संचालकांनी हस्तक्षेप करत तालुक्यातील १८ जिनिंगांना सब-यार्ड घोषित केले. तेथे
शासकीय खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे बाजार समितीच्या अधिकारांना बगल मिळाली. यावरून तालुक्यातील कापसाचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

सुरवातीला तालुक्यात दोनच जिनिंगवर खरेदी सुरू होती, मात्र ग्रेडरअभावी ती बंद पडली. आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुका सहकारी जिनिंगमध्ये खरेदीसाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. दुसरीकडे, भाजप पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील पात्र असलेल्या सर्व जिनिंगवर केंद्र सुरू करण्याची मागणी शासन दरबारी लावून धरली होती. सीसीआय कार्यालयाने निर्दे श देऊनही बाजार समिती एनओसी देण्यास टाळाटाळ करत होती. अखे भाजपचे प्रदेश सचिव सुरेश बनकर, इद्रिस मुलतानी आणि ज्ञानेश्वर मोठे यांच्य पाठपुराव्यामुळे पणन संचालकांनी जिल्ह निबंधकांना पत्र लिहून १८ जिनिंगन मान्यता दिली. यामुळे शेतकऱ्यांना आत तालुक्यात १८ विविध ठिकाणी आपल कापूस हमीभावाने विकता येणार आहे.

घोषित केलेली केंद्रे
ऋषी फायबर, जय भगवान बाबा, हरिओम, गौरीशंकर कोटेक्स, जोशी कोटेक्स, श्री रोकडोबा महाराज जिनिंग, पुनीत इंटरप्राइजेस, किंजल, सचिन फाइंड, त्रिवेणी कॉटन इंडस्ट्रीज, सिल्लोड तालुका कॉटन जिनिंग, राजा राजेश्वर, राधा सर्वेश्वर, ओम यार एजन्सी, अग्रवाल कोटेक्स, नवीन कोटेक्स, तयाल कॉटन आणि माणिक कॉटन.